( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील उक्षी फाटा ते वांद्री फाटा यादरम्याने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या डोजर मशीन मधून डिझेल चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अज्ञात इसमाविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात प्रेमचंद दशरथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, उक्षी फाटा ते वांद्री फाटा या ठिकाणी रस्त्याचे काम करताना ठेवण्यात आलेल्या जे.एम.म्हात्रे कंपनीच्या दोन मशीन पैकी सात नंबरच्या मशीन मधील सुमारे ४० लिटर डिझेल व आठ नंबर डोझर मशीन मधील ९० लिटर डिझेल असे एकूण ११ हजार ७०० डिझेल मंगळवार दि. २९ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने कामगारांच्या संमतीशिवाय नेल्याची फिर्याद दिली आहे. त्यांने दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.