(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत, त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. पोलीस दलातील कार्यक्षमता, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा याचे हे प्रतीक मानले जाणारे हे सन्मानचिन्ह मिळणे ही मोठी गौरवाची बाब मानली जात आहे.
या यादीत विविध श्रेणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ‘प्रवर्ग-१०’ अंतर्गत विशेष सेवाभाव दाखवणाऱ्या रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार नितीन डोळस यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
‘प्रवर्ग-८’ अंतर्गत १५ वर्षांहून अधिक काळ निष्ठेने सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे:
नितीन ढेरे – पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी
सुधाकर रहाटे – सहाय्यक पोलीस फौजदार, महामार्ग मदत केंद्र, करोडी
संजय मुरकर – सहाय्यक पोलीस फौजदार, महामार्ग मदत केंद्र, हातखंबा
दिपक पवार – सहाय्यक पोलीस फौजदार, देवरुख पोलीस ठाणे
राजेंद्र सावंत – सहाय्यक पोलीस फौजदार, रत्नागिरी शहर
दिनेश आखाडे – पोलीस हवालदार, जिल्हा वाहतूक शाखा
विजय मोरे – पोलीस हवालदार, महामार्ग मदत केंद्र, करोडी
प्रकाश मोरे – पोलीस हवालदार, पूर्णगड
सोनाली शिंदे – महिला पोलीस हवालदार
दिपक ओतारी – पोलीस हवालदार, अलोरे
मिलिंद कदम – पोलीस हवालदार, जयगड
प्रितेश शिंदे – पोलीस हवालदार, चिपळूण
संतोष सडकर – पोलीस हवालदार, दापोली
महेश सावंत – सहाय्यक पोलीस फौजदार, पूर्णगडया पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा, दक्षता आणि प्रामाणिकपणामुळे रत्नागिरी पोलीस दलाची विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे. त्यांच्या या गौरवामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा संचारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.