(गणपतीपुळे /वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका असणारे कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे आज मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
मागील अनेक वर्षे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात कार्यरत राहून अरुण नेरुरकर यांनी सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. अत्यंत मृदू व नम्र स्वभाव यामुळे त्यांनी अनेक संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचे सोडून जाणे ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या परिवारासाठी अत्यंत दुःखद घटना ठरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सांयकाळी ०४:०० वाजता त्यांच्या रत्नागिरी येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व शाखांकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आज कवी केशवसुत जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विश्वस्त अरुण नेरुळकर यांच्या निधनाची बातमी समजताच येथील सर्व कार्यक्रम तत्काळ रद्द करून कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांचे वतीने अरुण नेरुळकर यांच्याप्रति भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे.

