(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कसबा (भेंडी बाजार )येथे राहणारी सौ. प्राजक्ता प्रतीक पाटेकर (वय वर्ष 25) ही विवाहित महिला दिनांक 9 एप्रिल रोजी 11.30 वाजताच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊन पत्ता न लागल्याने तीचा पती प्रतीक प्रकाश पाटेकर याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सौ. प्राजक्ता प्रतीक पाटेकर हिने कसबा भेंडीबाजार येथील राहत्या घरातून बाहेर जाताना कोणालाहीकल्पना दिली नाही. सौ. प्राजक्ता ही अंगाने मजबूत असून उंची 4 फूट 11 इंच, रंग सावळा,असा वर्ण तीचा असून घरातून जातेवेळी अंगात क्रीम रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाचा पायजामा परिधान केलेला आहे. तिच्या डाव्या हातावर इंग्लिश मध्ये S P व उजव्या हातावर इंग्लिश मध्ये PRATIK असे गोंदलेले आहे. तिच्याकडे नोकिया कंपनीचा मोबाईल असून त्या मोबाईलमध्ये असलेल्या सिम चा नंबर 9421739459असा आहे. हातात अबोली रंगाची सॅक, गळ्यात एक ग्राम सोन्याचे मंगळसूत्र, कानात सोन्याचे टॉप्स आहेत, पायात निळ्या रंगाची सॅन्डल आहे. तसेच ती मराठी भाषा बोलते.
बेपत्ता प्राजक्ता चा शोध परिसरात तसेच नातेवाईकांच्या येथे घेऊन तिचा पत्ता न लागल्याने ग्रामपंचायत शिपाई असलेला तिचा पती प्रतीक पाटेकर याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापता असल्याची नोंद दाखल केली आहे. गावातील श्वेता महाडिक यांच्या नणंद शुभांगी शिंदे यांना सौ. प्राजक्ता ही पनवेल येथे एस. टी बस मध्ये दिसून आली होती. मात्र ती अद्याप घरी परतली नाही असेही त्यांनी फिर्यादित नमूद केले आहे. संगमेश्वर पोलिसांनी नापता रजिस्ट्री नोंद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करत आहेत.