( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कला ही दैवी देणगी आहे, ज्यांच्या हाती ती असते ते नक्कीच भाग्यवान. संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या कला विभागाने उभारलेले कलादालन आणि कलावर्ग तालुक्यासाठीच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आदर्शवत असा आहे. विद्यार्थ्यांनी कलेचा ध्यास घेतल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंत यांनी केले.
संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कुल मध्ये पायाभूत चाचणी परीक्षा, तपासणीसाठी संगमेश्वर पंचायत समितीचे पथक शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रप्रमुख सौ. उज्वला धामणस्कर, संदीप सुर्वे, संतोष जोशी यांच्या समवेत आले असता त्यांनी प्रशालेच्या कलावर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली.कलावर्गात कलाविषयक कोणकोणते उपक्रम राबवले, जातात याची देखील माहिती घेतली. कलावर्गासह कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून सर्वांनी समाधान व्यक्त करत सर्व कलाकृतींची बारकाईने पहाणी केली. प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन कलावर्गात राबाविल्या जाणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती दिली.
(फोटो : अण्णासाहेब बळवंतराव शिक्षण विस्तार अधिकारी, सौ. उज्वला धामणस्कर, संदीप सुर्वे संतोष जोशी केंद्रप्रमुख, यांनी
पैसा फंड कलादालनाला भेट देवून कलाकृतीची पाहणी केली सोबत मुख्याध्यापक सचिनदेव खामकर)