(देवरूख / ज्योती आठल्ये)
रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगा उत्सवाबद्दल सांगायचे झाले तर अनेक गावात शिमग्याच्या विविध परंपरा आहेत. मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावातील शिमगा उत्सव हा आगळावेगळा आहे. या गावात पालखी नाही. तर शिमगोत्सवात ग्रामदेवतांची पालखी सोहळा नसलेले एकमेव गाव आहे.
गणेशभट्ट सप्रे यांना वतन म्हणून दीलेला हा सुभा पाणथळ भाग असलेल्या कोंडात गणेशभट्ट सप्रे यांनी वसवला असल्याने गावचे नाव कोंढ्रण पडले. या गावची ग्रामदेवता जाखमाता देवी आहे. या देवीचे प्रमुख मानकरी हे सप्रे आहेत. देवीचे कुठलेही कार्य सप्रे कुटुंबातील व्यक्ती शिवाय पारपाडले जात नाही. त्याचप्रमाणे कोकणात शिकारीचे प्रस्थ प्रचंड आहे, परंतु कोंढ्रण गावात बार काढणे यालाही बंदी आहे.
निसर्गाच्या विविध घटा असलेल्या या गावात घनदाट जंगलात ग्रामदेवी मंदिर आहे. २५ ते ३० वर्षापुर्वी गवा, वाघ, बिबट्या, शाळीदर, कोल्हा, भेकरू, मोर, गिधाड आदी विविध प्राणी व पक्षी सहज वावरता दिसायचे, हल्ली ते प्रमाण कमी आहे. गावात सप्रे मंडळींची अनेक घर होती. सप्रे कुटुंबातील आताची ही आठवी पिढी आहे. सध्या गावात पाच ते सहा घर असून गावा कोणी कायम वास्तव्याला राहत नाहीत, काही सप्रे कुटूंबीय हे देवरुख व देव धामापूर गावात तर अनेक जण पर गाव व राज्यात वास्तव्यास आहेत. तरी गावच्या व देवीच्या कार्यक्रमाला मानकरी म्हणून सप्रे कुंटूबीय गावात येवून देवीचे कार्य करतात. गावातील पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा जोपासताना सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन उत्सव करतात त्यामुळे गावात कोणताही तंटा नाही, सर्व गाव गुण्यागोविंदाने एकत्र हा सण साजरा करतात.
होळीकोत्सवात प्रथम देवळातील देव त्याला रूपे चढवणे असे म्हणतात. जाखमाता देवीला मानकर सप्रे कुटुंबीय त्याचेकडील रूपे धारण करतात. रुप चढल्यावर देवीला दागदागिन्यानी सजवीले जाते. व देवीची विधीवत पुजाअर्चा केली जाते. त्यानंतर होम तयार केला जातो तो सामायिक असतो. होळी गावातून तोडून गावकरी हातावरून वाजत गाजत नाचवत देवळात आणतात व देवीच्या प्रांगणात उत्साहात नाचवितात व त्यानंतर ती उभी करून तीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर तयार केलेला होम तो सामायिक असतो तो होम पेटविण्याचा मान खोत म्हणून सप्रे यांचा असल्याने तो सप्रे कुटुंबाकडून पेटवीला जातो.
त्यानंतर देवळात देवीला प्रदान केलेले हातभेटीचे नारळ.ओट्या. पुर्ण झालेले नवस मानवले जातात. व बोलले जातात व शिमगोत्सव संपतो. जाखमाता देवी ही नवसाला पावतेच यावर श्रद्धा असलेले पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील अनेक भाविक नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी या उत्सवात आर्जवून येतात..असा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव पालखी नसलेला कोंढ्रण गावचा आगळावेगळा शिमगोत्सव अनेक वर्षे शांततेत पार पडतो आहे.