(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक्षक पतपेढी सभागृह चिपळूण येथे नुकतीसंपन्न झाली. या अधिवेशनात शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गराटे तर जिल्हा सरचिटणीस पदी संतोष रावणंग यांची निवड करण्यात आली.
या त्रैवार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष राज्य नेते संभाजीराव थोरात तर विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. श्री उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा रत्नागिरी श्री योगेश कदम (गृह, महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), आमदार श्री भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे, राज्य संपर्क प्रमुख विकास नलावडे, जिल्हाध्यक्ष व राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उदय सामंत यांनी राज्यस्तरीय प्रश्नांसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सचिवांसोबत मिटिंग घेऊन बदली प्रश्न संच मान्यता इ.प्रश्नांवर एकत्रित मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले. तर योगेश कदम यांनी शिक्षक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. आमदार भास्करराव जाधव यांनी जर शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर त्याची दाद विधानसभेत आवाज उठवेन असा शब्द दिला.
जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
जिल्हा नेते कैलास शार्दुल, जिल्हाध्यक्ष अजय गराटे, जिल्हा सरचिटणीस संतोष रावणंग, कार्यकारी अध्यक्ष दिलीप तारवे, कार्याध्यक्ष अंगद अबुज, कार्याध्यक्ष मंगेश कडवईकर, कोषाध्यक्ष सत्यजित पाटील, महिला जिल्हा प्रमुख सौ समिधा कोलते, महिला सचिव सौ माधवी वारे, कार्याध्यक्ष सौ मृण्मयी मोरे यांची निवड करण्यात आली.
या अधिवेशनला वार्षिक अधिवेशनाला जिल्हा नेते महेंद्र सावंत, जिल्हा सचिव संदीप जालगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, संचालक गुहागर श्री.चंद्रकांत झगडे, संचालक मंडणगड श्री. मनेश शिंदे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.मनोजकुमार खानविलकर, मंडणगड तालुकाध्यक्ष निलेश देवक, दापोली तालुकाध्यक्ष श्री.संदीप जालगावकर, खेड तालुकाध्यक्ष श्री.संजय तांदळे, गुहागर तालुकाध्यक्ष श्री.रविंद्र कुळे, चिपळूण तालुकाध्यक्ष श्री.राजेश सोहनी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री.रामचंद्र निकम, लांजा तालुकाध्यक्ष श्री.मंगेश मोरे, राजापूर तालुकाध्यक्ष श्री. संदीप परटवलकर संचालक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो : जिल्हा नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना मंत्री उदय सामंत