(देवरुख)
आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच जिल्हास्तरीय “आय स्पार्क २०२५ हा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (एस) संघटनेने हा उपक्रम घेतला. यामध्ये विविध अशा आकर्षक स्पर्धाचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राजेंद्र माने पॉलिटेक्नीक, तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांसहित राजेंद्र माने पॉलिटेक्नीक, राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्रमुख पाहुणे डॉ. उमेशकुमार मुरलीधर बागल, प्रभारी प्राचार्य, ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स तसेच विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत वेब डिझायनिंग गूगल इट, वेब डिझाइनिंग, कोड हंट, पीसी असेंब्ली, ब्रेक द क्वेरी, बीजीएमआय गेमिंग यासारख्या आकर्षक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून जवळपास शंभर विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यातील वेब डिझाइनिंग स्पर्धेत गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून ऋुतिक बाणे याने प्रथम क्रमांक पटकावला..तसेच, महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मानस दिनेश विचारे या विद्यार्थ्याने ‘गूगल इट’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.तसेच बीजीएमआय गेमिंग या स्पर्धेत फाईट क्लब एसपोर्ट्स या टीममधून आर्यन अमित भटकर, रोहीश बेहेरा, शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, अजिंक्य शिगवण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला..
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके व पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नूतन मुळे, विद्यार्थी प्रमुख यश सावर्डेकर,पूजा जोशी, सिद्धेश गुरव तसेच विभागीय प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.