(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन,रत्नागिरी मार्फत महिलांच्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा रत्नागिरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या मैदानात नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकूण बारा महिलांचे संघ सहभागी झाले होते. दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये अतिशय चुरशीचे असे सामने या स्पर्धेत झाले. यावेळी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
या स्पर्धेत वाटद खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ सहभागी झाला होता.आपले प्रथम फेरीचे चार सामने जिंकून हा संघ अंतिम सामन्यात सहभागी झाला होता.परंतु या संघाला अंतिम सामन्यात निसटता पराभव सहन करावा लागला. व उपविजयी पदावर समाधान मानावे लागले.परंतु आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करून या संघाने प्रेक्षकांची व आयोजकांची वाहवा मिळवली.

संपूर्ण कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच या कॉलेजचा संघ अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता. नुकत्याच झालेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेत 17 व 19 वयोगटांमध्ये या संघाने राज्यापर्यंत मजल मारली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा अतिशय चांगला मुलींचा क्रिकेटचा संघ आहे.या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने स्पर्धेवर आपली प्रचंड छाप पडलेली मनाली निंबरे हिने अष्टपैलू व उत्कृष्ट गोलंदाज अशी दोन बक्षिसे मिळवली तर याच संघातील सानिया महाकाळ हिने उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला.
या संघाला क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव क्रीडा शिक्षिका पल्लवी बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.या संघात मनाली निंबरे (कर्णधार),सानिया महाकाळ, पूजा जाधव, निधी डाफळे, आश्लेषा लोकरे, सानिका अलीम, इच्छा शिंदे, दिशा डाफळे, जयश्री शितप, सिद्धी केसरकर, सलोनी कुर्टे, तेजस्वी धनावडे हे खेळाडू होते. या यशस्वी संघाचे संस्था अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष नाथाशेठ आडाव, सचिव समीरशेठ बोरकर, मा.सुभाषराव विचारे, संदीपशेठ सुर्वे, अनिकेत सुर्वे, किशोर मोहित, तुषारशेठ चव्हाण, बाबुशेठ पाटील सर्व संचालक व मुख्याध्यापक शिवाजी जगताप पर्यवेक्षक आनंदा पाटील, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून कौतुक केले.

