(रत्नागिरी)
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलांच्य बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे ७०० खेळाडू सहभागी झाले होते. पदक विजेते गणराज क्लबचे खेळाडू पुढील प्रमाणे- सब-ज्युनियर मुले व मुली सुवर्ण पदक-तीर्था मकवाना,बरखा संदे, रुद्र जाधव, सब-ज्युनियर मुले व मुली कांस्य पदक- आदित्य मोरे, विहान शेटये, सहभाग खेळाडू-ओम झगडे, मंथन कोडवडेकर, आयरा मुकादम, दुर्वा हातिसकर,
स्पेशल गट- सुवर्ण पदक- स्पर्श रेडीज, तुषांत विलणकर, कांस्य पदक-निरज मकवाना, युबना संदे, कॅडेट गट अखिलेश वांयगणकर-कांस्य पदक,
ज्युनियर गट सुवर्ण पदक- त्रिशा मयेकर, गौरी विलणकर, रोप्य पदक – समर्थ विचारे, स्वांनद तुपे, कांस्य पदक- आदया कवितके, सोनाक्षी यादव, सिनियर गट सुवर्ण पदक-गौरी विलणकर, रौप्य पदक-वत्रिशा मयेकर, कांस्य तो पदक-स्वांनद तुपे, बरखा संदे हीला बेस्ट फायर्टस ने सन्मानित करण्यात आले.
तर पदक विजेते खेळाडूंना शुभेच्छा देताना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, सुनिल किर, क्लबचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, कोषाध्यक्ष नेहा किर, सदस्य साक्षी मयेकर, पुजा कवितके, यशंवत शेलार, कनिष्का शेलार यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रमुख तायक्वांदो प्रशिक्षक एशियन युनियन कोच प्रशांत मकवाना, महिला प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना NIS प्रशिक्षक अनिकेत पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.