(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संगमेश्वर तालुका शाखेची सभा देवरुख येथे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र रणसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तालुक्याच्या अध्यक्षपदी रविंद्र दरडी तर सचिव पदी संदेश सावंत यांची निवड करण्यात आली
सभेत सन २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.
यामध्ये श्री. रविंद्र दरडी यांची तालुका अध्यक्षपदी, तर श्री. संदेश सावंत यांची सरचिटणीसपदी बहुमताने निवड झाली. उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
- कार्याध्यक्ष: श्री. शशिकांत करंडे
- उपाध्यक्ष: श्री. संजय मोरे, श्री. निलेश तरंगे
- कोषाध्यक्ष: श्री. नथुराम पाचकले
- कार्यालयीन चिटणीस: श्री. संजय जाधव
- सहचिटणीस: श्री. आनंदा मोरे
- महिला आघाडी प्रमुख: सौ. धनश्री आंबवकर
- महिला सदस्य: सौ. सायली सावंत, सौ. नेहा दरडी, सौ. नेहा पाचकले, सौ. वैशाली चव्हाण, सौ. सुलभा जाधव, सौ. तेजस्विनी पाटील, सौ. जयश्री भोजने, सौ. सुरेखा गायकवाड
- विभाग प्रमुख: श्री. धनाजी मोटे (साखरपा), श्री. सुदेश मोहिते (कोळंबे बीट)
- जिल्हा कार्यकारिणी सदस्य: श्री. विलास गुरव, श्री. अंबादास कवितके
- सल्लागार: श्री. प्रकाश शिंदे, श्री. दिलीप वाळके, श्री. भानुदास ढेंगळे
- शिक्षक नेते: श्री. चंद्रकांत बाटेनिवडीनंतर उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र रणसे
यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य कार्याध्यक्ष श्री. संतोष कदम, जिल्हाध्यक्ष श्री. अजय गराटे आणि माजी तालुका अध्यक्ष श्री. निकम यांनीही पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय मोरे यांनी केले.

