(रत्नागिरी)
शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे कबड्डी खेळताना मानेला गंभीर दुखापत झालेल्या पूर्णगड येथील कबड्डीपटूचा मुंबईत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मानस यशवंत आडविरकर (वय २३) असे त्याचे नाव असून, जवळपास २१ दिवस सुरू असलेली त्याची मृत्यूची झुंज अखेर रविवारी अपयशी ठरली.
मानस हा मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेतील एका संघांत सहभागी झाला होता. स्पर्धेत २ डिसेंबरला झालेल्या एका सामन्यात खेळताना मानस याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्याला पुढील उपचारांसाठी प्रथम कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते.