(रत्नागिरी)
रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी देशाच्या जडणघडणीत प्रगतीच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देवून सन्मान करण्यात येतो. रत्नागिरी येथील बीएड कॉलेज येथे बुधवार (दि. २ ऑक्टो) ११ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब नेशन बिल्डर अवॉर्ड 2024 रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे असिस्टंट गव्हर्नर ॲड. शालमली आंबुलकर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.रूपेश पेडणेकर, सचिव ॲड.मनिष नलावडे, इव्हेंट चेअर पर्सन विनायक हातखंबकर, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजश्री देशपांडे मॅडम, सिनिअर रोटेरीयन धरमसी चौहान,कॅप्टन दिलीप भाटकर, रवींद्र इनामदार, निलेश मुळ्ये, मंदार सावंतदेसाई, राजेंद्र घाग, श्रीकांत भूर्के, प्रमोद कुलकर्णी, आनंद चौगुले, सुरेंद्र यारम, जयेश काळोखे उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विविध विषयांत पारंगत व शैक्षणिक कार्यापलीकडे जात अभिमान वाटावा, असे कार्य करत सर्वोच्च योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यात शिक्षक, शिक्षिका यांचा समावेश होता. यावेळी रोटरीचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक, नागरिक व महिला उपस्थित होत्या. सोहळ्यात उत्साहाचे वातावरण होते.
खालील सन्मानमूर्ती शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
१) डॉ.राजश्री देशपांडे ( प्राचार्य बीएड कॉलेज)
२)श्री.बी.के गोंडाळ (जूवाटी, राजापुर विद्यालय)
३)सौ.अंजली पिलणकर ( मराठा मंदिर अ.के देसाई विद्यालय)
४)श्री.महेश नवेले (रनपार शाळा)
५)श्री. माधव अंकलगे (वरवडे- वाटद विद्यालय)
६)श्रीमती अनुप्रिता आठल्ये( नाचणे जिल्हापरिषद पूर्ण प्राथमीक शाळा)
७)श्री.राजेश गोसावी (झरेवाडी जिल्हापरिषद शाळा)
८)सौ.धनश्री मुसळे ( मुख्याद्यापक बियाणी विद्यालय)
९)श्री.मिलिंद तेंडुलकर (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था)
१०)श्री.रवींद्र जानवेकर प्राचार्य( आय.टी.आय मुलींची)
तसेच 102 वेळा रक्तदान करणारे व कीर लॉ कॉलेज चे श्री मोरेश्वर जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.मुग्धा कुळ्ये आणि सौ.माधुरी कळंबटे यांनी केले.