(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत कासारी जयगड येथील राज उदय माने याने उल्लेखनीय कामगिरी करत लांब उडीच्या २० वर्षांखालील (U-20) गटात तृतीय क्रमांक पटकावला.
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील S.V.J.C.T. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ९ ऑगस्ट २०२६ रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज उदय माने याने लांब उडीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली.
राजच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. मेहनत, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर राजने मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्याच्या अॅथलेटिक्स क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

