(दापोली)
कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मैदानात दोन दिवस सुरु असलेल्या पं.स.दापोली शिक्षण विभागाच्या शालेय क्रीडा महोत्सवाची मंगळवारी २४ रोजी सांगता झाली. तालुक्यातून सहा प्रभागातून निवडक स्पर्धकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने उंबर्ले प्रभागाने सर्वसाधारण विजेतेपद तर गावतळे प्रभागाने उपविजेते पदक पटकावले.

संपूर्ण सोहळ्यासाठी बक्षीसे, बळीराजा शेतकरी संघ जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर यांनी दिली होती. गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या क्रीडामहोत्सवा प्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. नोडल आॅफीसर रामचंद्र सांगडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करणेसाठी मेहनत घेतली.
सांगता सोहळ्याचे सुत्रसंचलन दिनकर क्षिरसागर यांनी केले. महेश गिम्हवणेकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड, प्रमुख अतिथी गणेश देवघरकर, अविनाश लोखंडे, व्हिजन चे अध्यक्ष धनंजय सिरसाट आदि केंद्रप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

