(संगमेश्वर / एजाज पटेल)
विश्व समता कलामंच लोवले व पोलीस बॉईज संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रज्ञा गौरव” कार्यक्रम संगमेश्वर पोलीस ठाणे येथील श्रम साफल्य सभागृहात नुकताच सपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सधिका ढोले या लहान मुलीने मधुर आवाजात केलेल्या स्वागत गीताने करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अॅडोकेट अमित शिरगांवकर, पोलीस निरीक्षक अमित यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधवी भिडे, विश्व् समता संस्थेचे सल्लागार यूयुत्सू आर्ते उपस्थित होते.
अॅडोकेट अमित शिरगांवकर यांनी कायदे विषयक तसेच नवीन कायद्या संदर्भात अतिशय महत्वाचे असे मार्गदर्शन करतानाच यामध्ये बालकामगार कायदा, स्त्री सुरक्षा, पॉस्को अंतर्गत कायदा, मोटर वाहन कायदा आदी विषयी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यूयुत्सू आर्ते, पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सुद्धा कायदेविषयक मार्गदर्शन केले.
जल, पर्यावरण, स्वच्छ्ता, कला, क्रीडा, संस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक, पत्रकारिता, जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय प्राविन्य मिळवलेले विध्यार्थी यांचा विश्वसमता कलामंच संस्थेकडून गत 12 वर्ष अविरतपणे मान्यवरांच्या उपस्थित व त्यांच्या शुभहस्ते ‘प्रज्ञा गौरव पत्र’ देऊन सन्मान करण्यात येतो.ते सातत्य कायम ठेऊन आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, सहाय्यक पो. उप निरीक्षक शांताराम पंदेरे, महिला पोलीस कॉन्सटेबल क्रांती सावंत यांना विश्वसमता गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
टीव्ही फेम आद्या अमोल शिरगांवकर ह्या लहान चिमुकलीला कला गौरव तर निलेश कदम व त्यांची पत्नी सानिका कदम यांना समाज गौरव पत्र पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे सत्तर जणांना कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र शाळ श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी परचुरी गावच्या सरपंच शर्वरी वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंद्रकर,पोलीस पाटील, निवृत्त शिक्षक, शिक्षिका, तंटामुक्त अध्यक्ष, निरंकार भक्तगन,विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला, पालक,पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता राहुल कोकाटे यांनी उत्तम पद्धतीने केले. तर मनोगत श्रीकृष्ण खातू व आभार संस्थेचे सदस्य दिनेश आंब्रे यांनी व्यक्त केले. गणपत रहाटे, राहुल कोकाटे, जितेंद्र सुतार, संजय शिंदे, प्रदीप चंद्रकर, आकाश शेट्ये यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.