(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी स्वरीत संदीप डांगे याने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.
स्वरीत संदीप डांगे याने यापूर्वी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर राजापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
स्वरीतला मार्गदर्शक श्री. रुपेश तावडे आणि क्रीडाशिक्षक श्री. संतोष सनगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक श्री. नितीन मोरे, विद्यालयाचे सी.ई.ओ. श्री. किशोर पाटील, संस्थेचे सचिव श्री. विनायक राऊत, कोषाध्यक्ष श्री. संदीप कदम आणि चेअरमन श्री. सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी अभिनंदन केले.


