(रत्नागिरी)
तालुक्यातील गोळप-पिंपळवाडी येथे जमिनीच्या वादातून दिराने भावजयीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीची ही घटना मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०,४५ वाजता घडली आहे. या प्रकरणी संजय रामचंद्र शिंदे (६०, रा. गोळप, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण झालेल्या त्यांच्या भावजयीने पूर्णगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यात जमिनीबाबत वाद सुरू आहेत. पीडितेच्या पतीने नवीन घराचे बांधकाम चालू केल्याने संशयित आरोपी संजयला राग आला होता. या रागातून त्याने भावजयीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाकडी दांडका तिच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी पूर्णगड पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

