( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड मेढेकर यांनी भेट देऊन स्वयंभू श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.
गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्ती भावात व उत्साहात संपन्न झाला. या अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनीही अंगारकी यात्रोत्सवानिमित्ताने उपस्थिती लावली होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री आणि मराठी मालिकांमधून विशेष लोकप्रिय असलेल्या कविता लाड मेढेकर यांनी भेट देऊन स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांचे गणपती मंदिरातील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ लिपिक महेश भिडे यांच्या हस्ते संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने श्रीं चा प्रसाद भेट देऊन मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गणपतीपुळे देवस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. या भेटीप्रंसगी अभिनेत्री कविता लाड मेढेकर यांनी संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या विविध उपक्रम आणि भक्तगणांना देण्यात येणाऱ्या सुयोग्य सेवेबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त करीत विशेष कौतुक केले.