( साखरपा/दीपक कांबळे )
श्री देव विरोबा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था तीवरे मेढे यांचे वतीने दूध उत्पादकांसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या वीस वर्षापासून यशस्वीपणे राबविला जात आहे.
येथील दूध उत्पादकांना मिळणाऱ्या दुधाच्या पगारातून दहा टक्के कपात केली जाते. आणि कपात केलेल्या ठेवीच्या रकमेतून दूध उत्पादकांना कर्ज पुरवठा केला जातो. तर दोन वर्षानंतर कपात केलेली रक्कम व्याजासह उत्पादकांना परत केली जाते. दिनांक 3 सप्टेंबर रोजी सुमारे अकरा लाख रुपये रकमेचे वाटप संस्थेच्या वतीने सहकारी संस्थेत संस्थेचे अध्यक्ष नाना सुर्वे व उपाध्यक्ष शिवाजी सुर्वेआणि संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दूध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना एका नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे चांगला लाभ मिळवून देणारी अशी ही एकमेव संस्था परिसरात आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नाना सुर्वे उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे सदस्य गणपत सुर्वे किशोर सुर्वे श्रीपत रामानेl व उत्पादक उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल तर्फे देवळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संतोष कांबळे आणि दूध संस्थेच्या वतीने सदस्य गणपत सुर्वे यांनी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे शाल श्रीफळ व पुष्प देऊन अभिनंदन केले या कामी संस्थेचे सचिव आत्माराम बाईक यांनी सुद्धा चांगले काम केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
या दूध संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष आत्माराम गुजाबा सुर्वे यांनी पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आज पहावयास मिळते. ही बाब तिवरे मेढे वासियांसाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी ठरतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.