(गुहागर / वार्ताहर)
तालुक्यातील गोणवली-कळेवाडी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरातील हॉलमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यशवंत महादेव कळे (वय ६७, रा. गोणवली, कळेवाडी, ता. गुहागर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.५० वाजण्यापूर्वी उघडकीस आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कळे हे त्यांच्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी राहणारे समीर सुरेश कामेरकर यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. या घटनेची गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


