(चिपळूण)
तालुक्यातील खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची निवड अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संलग्न आचार्य नरेंद्र देव कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे आयोजित आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी झाली आहे.
या भव्य स्पर्धा २ मे ते ५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयाचे खालील विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात निवडले गेले आहेत:
-
कबड्डी (मुले) : अमिश माने, शिवराज पाटील, सोहम मोरे
-
खो-खो (मुले) : चेतन पावरा, सुबोध पोळ, प्रफुल्ल वायकर, तेजस भेलके
-
व्हॉलीबॉल (मुले) : सचिन पाटील, प्रशांत साळुंके
या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे चे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निवड झालेले हे सर्व खेळाडू डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे विद्यापीठ संघातील ३० खेळाडूंमध्ये शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे तब्बल ९ विद्यार्थी सहभागी आहेत. या यशस्वी निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील आणि क्रीडा निर्देशक प्रा. सुहास आडनाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.