( रत्नागिरी / वार्ताहर )
मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या मुंबई येथे झालेल्या अंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी मोरे हिने शास्त्रीय गायन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
तन्वी मोरे हिला सौ. विनया परब (रत्नागिरी) यांचे मार्गदर्शन लाभले. तबल्यावर स्वरूप नेने, तर हार्मोनियमवर श्रीरंग जोगळेकर यांनी साथसंगत केली.
तन्वीच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साकळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी तिचे अभिनंदन केले.


