(देवळे / प्रकाश चाळके)
माय भारत रत्नागिरी (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पखवाडा आणि वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिव स्वराज्य फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा, विठ्ठल रखुमाई मध्यवर्ती विकास मंडळ, माजळ तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर (बाळगोपाळ मित्र मंडळ), वेरवली येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यासोबतच फणस, केशर आंबा, नारळ, वड आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हे अभियान उत्साहात संपन्न झाले. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी माय भारत रत्नागिरीचे जिल्हा युवा अधिकारी श्री. सम्राट विजय पाटील यांनी प्रोत्साहन दिले.
या उपक्रमासाठी शिव स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक प्रताप पवार, अध्यक्ष चंद्रशेखर धावणे, कार्याध्यक्ष दिनेश पवार, खजिनदार संदीप परब, संचालक किशोर सावंत, विकास चव्हाण, संदेश माजळकर, किरण परब, प्रदीप माजळकर आणि उमेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजाच्या प्राचार्या सौ. सुवर्णा देऊसकर, शिव स्वराज्य फाउंडेशनचे सल्लागार डॉ. स्वरूप एकलुरे, प्रा. सतीश मराठे, प्रा. अमोल मेस्त्री, श्रीधर माजळकर तसेच ह.भ.प. चंद्रकांत राणे बुवा यांची प्रमुख उपस्थिती होती.


