(चिपळूण/ रत्नागिरी)
चिपळूण तालुक्यातील पोफळी नाका येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यसेवन करून गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, साईराज श्रीकांत जाधव (वय २१, रा. पोफळी नाका, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा पोफळी नाका येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यसेवन करून मद्याच्या अंमलाखाली गोंधळ घालत असल्याचे आढळून आले. तसेच, त्याच्या वर्तनामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन करीत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय दादा माने (वय ३०), नेमणूक अलोरे-शिरगाव पोलिस ठाणे, यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या आधारे साईराज जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे.


