(संगमेश्वर / संदेश जिमन)
दिनांक १५ ,१६ सप्टेंबर २०२५ रोजी क्रिडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदिर रत्नागिरी या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कसबा येथे अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या पुष्कर दत्ताराम गीते याने ६५ किलो वजनी गटात जिल्ह्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या विद्यार्थ्यांची निवड विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. या कामगिरीमुळे अंत्रवलीसह संगमेश्वर तालुक्यातील पुष्कर चे अभिनंदन केले जात आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून पुष्करला भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. एच जी शेख व पर्यवेक्षक श्री एस ए पटेल यांच्या प्रेरणेतून क्रिडा शिक्षक श्री आर एच तांबोळी यांच्या विशेष मार्गदर्शनाने पुष्कर या कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करु शकलो असे पुष्कर याने सांगितले.

