(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकृत काजू प्रक्रिया धारक संघाची विविध विषयांबाबत एक महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या बैठकीला जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघा मार्फत करण्यात आले आहे. ही सभा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित केली आहे.
काजू प्रक्रिया धारक कारखानदारांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणी तसेच काजू बोर्ड, वेगवेगळे आकारले जाणारे कर अशा अनेक विषयांवर चर्चा करून काजू उद्योगांना येणाऱ्या अडचणी व त्यातून मार्ग काढण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे.
काजू प्रक्रिया धारक उद्योजकानी या सभेला जास्तीत जास्त उपस्थित राहून या चर्चेत भाग घ्यावा व प्रक्रिया धारकांना येणाऱ्या अडचणींबाबत सखोल चर्चा करावी व आपली मागणी पुढे शासन दरबारी नेण्यासाठी नवीन कार्यकारणीही निवडावी या उद्देशाने या सभेचे आयोजन केल्याचे समजते. या सभेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


