(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायतला केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत हा पुरस्कार नुकत्याच झालेल्या संगमेश्वर आमसभेत सरपंच ग्रामसेवक यांना प्रदान करण्यात आला. 26 सप्टेंबर 2025 रोजी माटे भोजने सभागृह देवरुख येथे पंचायत समिती संगमेश्वर तर्फे आयोजित कार्यक्रमात देवळे ग्रामपंचायतीला केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत “सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवळे गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती विजया कोरगावकर, ग्रामसेवक महाडीक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेली दोन वर्षे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 48 घरकुले मंजूर झाली ही घरकुले पूर्ण होण्यासाठी सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी परिश्रम घेतले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन वर्षे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एकूण 48 घरकुले मंजूर होती त्या 48 कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व कागदपत्रांची तरतूद करून ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती विजया कोरगावकर ग्रामसेवक महाडिक व सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घेतली, त्यामुळे देवळे ग्रामपंचायत अंतर्गत 48 कुटुंबना घरकुल योजनेचा लाभ झाला.

