(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत दि.१७ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्र क्र. ३ व४ अन्वये निर्देशित केलेप्रमाणे सन २०२५-२६ ची डी. एल. एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.२५ मे पासून सुरू झालेली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दि. १० जून पर्यंत देण्यात आली होती.
तथापि संदर्भीय पत्र क्र ५ व ६ अन्वये संबंधितांनी विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करणेकरिता तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑनलाइन अर्ज सादर करणेसाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे. प्राप्त विनंती अर्जानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दि. १७ जून पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यानुसार फेरीनिहाय शासकीय व व्यवस्थापन कोट्याचे सुधारित वेळापत्रक, विद्यार्थ्यांनी विकल्प भरण्याची मुदत दिनांक प्रथम वर्ष सुरू दिनांक, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी अध्यापक विद्यालयनिहाय झालेल्या प्रवेशाचा आढावा घेणे. इत्यादी तपशिलाचे वेळापत्रक, परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे.
दि.१७ जून नंतर ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. प्रवेशप्रक्रियेसंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना यापूर्वीच संदर्भ क्र ३ व ४ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचनान्वये सुधारित वेळापत्रकेनुसार डी. एल. एड. प्रवेश प्रक्रियेबाबत संबंधितांनी विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सह सचिव प्राध्यापक सुनिल जोपळे यांनी केले आहे.