(गणपतीपुळे / वैभव पवार)
डेरवण येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन गटांत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
१७ वर्षे मुलींच्या गटात कु. देवर्षी शैलेश कासार हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १४ वर्षे मुलांच्या गटात कु. कृष्णा शैलेश कासार याने प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीनंतर दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनिया सेठी यांनी त्यांचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक श्री. रणजित जाधव, सौ. मिथिला मोरे, आदित्य पवार आणि रोहित यांचे तसेच वैयक्तिक प्रशिक्षक श्री. पुष्कराज इंगवले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जिंदल विद्या मंदिरमधील सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचे अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


