( राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात येत असून, गावागावांत नागरिकांशी संपर्क वाढविण्यासह पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्षाचे संघटनात्मक कामकाज सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. स्थानिक प्रश्न, गावपातळीवरील विकासकामांचा पाठपुरावा आणि स्थानिक नेतृत्वाच्या गरजेला प्राधान्य देत अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर कोंडसर खुर्द येथील शेडेकरवाडीतील प्रमुख ग्रामस्थांसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे कोंडसर खुर्द परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपा मंडल अध्यक्ष मोहन घुमे, ओबीसी अध्यक्ष संदीप तेरवणकर, ज्येष्ठ नेते बाळ दाते, भाई फणसे, वरद गोरे, संतोष नांदगावकर, मनीष नांदगावकर, संजय पड्यार, संदेश भोसले आणि घनश्याम तळये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
गावागावांत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
२९ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख ग्रामस्थांमध्ये आकांक्षा हेमंत शेडेकर, हेमंत गणपत शेडेकर, प्रकाश गोविंद शेडेकर, कोमल प्रकाश शेडेकर, सावित्री गोविंद शेडेकर, समीर सूर्यकांत शेडेकर, शंकर कृष्णा तळये, महेश कृष्णा तळये, साईनाथ राजाराम वारीक, प्रवीण पांडुरंग शेडकर, महेश महादेव दळवे, केशव विष्णू पड्यार, मनोज मधुकर शेडेकर, स्वप्नील भिकाजी शेडेकर, सदानंद तुकाराम शेडेकर, संतोष बाळू शेडेकर, शांताराम सदू शेडेकर, किरण पांडुरंग कोबळी, अनंत गोवाळ शेडेकर, अनंत बाळू शेडेकर, संजना संतोष शेडेकर, सुशिला शिवा शेडेकर, वैशाली विलास शेडेकर, राजाराम गोविंद पड्यार, मनिषा मधुकर शेडेकर, कार्तिकी केशव पड्यार आणि आर्या स्वप्नील शेडेकर यांचा समावेश आहे. या प्रमुख ग्रामस्थांसह शेडेकरवाडी व परिसरातील अन्य ग्रामस्थांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शेडेकरवाडीतील या पक्षप्रवेशामुळे कोंडसर खुर्द परिसरातील पक्ष संघटनेला बळ मिळाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. आगामी काळात गावागावांत नागरिकांशी संपर्क वाढवून संघटनात्मक उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


