(चिपळूण / वार्ताहर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. उमर शोएब खतीब याने पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
उमरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी विद्यालयातील माध्यमिक शिक्षक तथा मराठी विषयाचे शिक्षक श्री. योगेश तानू पेढांबकर यांचे उमरला विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशामुळे गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच साहित्यिक क्षेत्रातील कामगिरीचेही कौतुक होत आहे. उमरच्या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब, व्हाईस चेअरमन जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उरूसा खतीब, सेक्रेटरी मुजाहिद मेयर, विद्यालयाचे मुख्याध्यापक इरफान शेख, उपमुख्याध्यापक इम्रान महत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


