(राजापूर / तुषार पाचलकर)
श्री महागणपती उत्सव मंडळ पाचल पेठवाडी आयोजित माघी गणेश जयंती उत्सव 2026 या निमित्ताने खुल्या सोलो लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील वयोगट हा 13 वर्षापुढील असणार आहे. गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी होणारी स्पर्धा श्री महागणपती मंदिर पाचल पेठवाडी येथील भव्य रंगमच्यावर होणार आहे.
प्रथम क्रमांकसाठी रुपये 7777 रोख द्वितीय 5555/ रोख व तृतीय क्रमांकसाठी 3333 / रोख रकमेची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार असून स्पर्धेची प्रवेश फी रुपये 200 आकारण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व इतर माहितीसाठी विनायक सक्रे -9421234069, ओंकार ताम्हणकर -8237626009, संकेत सक्रे -9595301316, चैतन्य पाथरे -8237089090 यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच जास्तीत जास्त स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

