( खेड / वार्ताहर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ खेड येथे उत्साहात पार पडला. राज्यव्यापी मोहिमेचा भाग असलेल्या या रोजगार मेळाव्याचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. खेड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला युवक-युवतींचा प्रतिसाद मिळाला.
रोजगार मेळाव्यादरम्यान भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सहभागी कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास (HR) अधिकाऱ्यांशी तसेच प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. स्थानिक युवकांना केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या न देता कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या न दिल्यास संबंधित कंपन्यांना जाब विचारण्यात येईल, असा इशाराही ॲड. खेडेकर यांनी दिला.
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये दीडशेहून अधिक कंपन्या कार्यरत असताना रोजगार महाकुंभात केवळ १५ कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल ॲड. खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात औद्योगिक आस्थापना कार्यरत असताना रोजगार मेळाव्यात त्यांचा अधिकाधिक सहभाग असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, भाजपा नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, नगरसेवक निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विनायक शिरगावकर, आनंद खेडेकर, बाळु वर्मा, श्याम तावडे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर आणि युवक-युवती उपस्थित होते.


