(खेड)
सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तसेच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुरस्कारप्राप्त श्री. हिराचंद बुटाला यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. बुटाला यांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा रत्नागिरी जिल्ह्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर कायम होता.
त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया नेरुळ, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. कुटुंबीय, नातेवाईक व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
स्थानिक समाजजीवन, शिक्षणक्षेत्र आणि राजकारणातील एक कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याने जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे..