(खेड)
नारळ खरेदीसाठी दुकानात गेलेल्या महिलेला सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम भरलेली पिशवी चोरीला गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी खेड एसटी स्टॅण्डजवळील दुकानात घडली. या चोरीत २ लाख २५ हजार ६०० रुपयांचा ऐवज गमवावा लागला.
सायली संदीप बडबे (वय ४०, रा. मुरडे-रामवाडी, खेड) या सायंकाळी साडेचारच्या सुमारास नारळ खरेदीसाठी खेड एसटी स्टॅण्डजवळील दुकानात गेल्या होत्या. त्यांनी आपली पर्स कपड्याच्या पिशवीत ठेवून ती दुकानाबाहेर ठेवल्यानंतर, खरेदी आटोपून परत येईपर्यंत ती पिशवी चोरीस गेली होती.
पर्समध्ये सुमारे २ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि ६०० रुपयांची रोख रक्कम होती. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारामुळे नारळ खरेदी महिला ग्राहकाला तब्बल सव्वा दोन लाखांचा पडल्याची चर्चा खेड परिसरात रंगली आहे.