(रत्नागिरी / वार्ताहर)
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गणपती मंदिर, गणपतीपुळे येथे भाविकांसाठी वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तातडीची प्राथमिक वैद्यकीय सेवा व आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देण्यात आली.
या वैद्यकीय मदत कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. राजेंद्र रणसे, CHO श्रीमती मनाली तारवे, श्रीमती माधुरी ठाकरे, आरोग्य सेवक श्री. प्रवीण मंडले, श्री. विक्रम जाधव, आशा सेविका श्रीमती सारिका गावणकर व मदतनीस श्रीमती सांची गावणकर यांनी उपस्थित राहून भाविकांना आरोग्य सेवा दिली.
अंगारकीनिमित्त भाविकांची सुरक्षितता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे मदतकक्ष प्रत्येक अंगारकी तसेच वार्षिक उत्सवाचे वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांचे सुचने नुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाखरे यांचे मार्हदर्शनाखाली नियोजन केले जाते.


