(दापोली /रत्नागिरी)
दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तसेच दम लागत असल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी दापोली येथे घडली. निकीता नामदेव राठोड (वय २२, मूळ रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक; सध्या रा. काळकाई कोंड, ता. दापोली) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकीता राठोड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना दम लागत असल्याने तसेच डायलिसिसची आवश्यकता असल्याने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१३ वाजता त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक ६९/२०२६ अशी नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये ही नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही दापोली पोलिस करीत आहेत.


