(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूर येथील रहिवासी तसेच रत्नागिरी येथील मेरीटाईम बोर्डचे अधिकारी वेदभूषण विद्याधर करगुटकर यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी विद्याधर करगुटकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
श्रीमती लक्ष्मी करगुटकर या जैतापूर येथील चव्हाटावाडी परिसरात वास्तव्यास होत्या. प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा परिवारासह नातेवाईक आणि परिचितांमध्ये स्नेहपूर्ण संबंध होता. त्यांच्या निधनाने करगुटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जैतापूर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच करगुटकर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच जैतापूर आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.
श्रीमती लक्ष्मी करगुटकर यांच्या अंत्ययात्रेला जैतापूर व परिसरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांतून करगुटकर कुटुंबीयांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी, दि. १९ ऑगस्ट २०२६) रोजी जैतापूर-अनंतवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

