(जाकादेवी / वार्ताहर)
दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील कु. अनय शेट्ये, कु. चैतन्य शेट्ये आणि कु. कवी संसारे या तीन गुणवान विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याच्या जोरावर या तिन्ही विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली त्यांची निवड ही शाळेसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशामध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका सौ. ऋतुजा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालक श्री. अभिजीत शेट्ये यांचे विशेष सहकार्य मिळाले. मुख्याध्यापिका सौ. देशमुख यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळत राहिले.
विद्यार्थ्यांच्या या राज्यस्तरीय निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

