( खेड / वार्ताहर )
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खेड नगर परिषद सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमुख उपक्रम राबवून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यात येणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी सांगितले.
१८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ला मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खेड येथे झालेल्या बैठकीत योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकासकामे, उपक्रम आणि त्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील विकासाच्या गरजा आणि अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या.
विकास आणि रोजगारनिर्मितीवर भर
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक संसाधने, क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर या योजनेत भर दिला जाणार आहे. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित घटकांमध्ये समन्वय वाढविणे, स्थानिक गरजांनुसार विकासकामांना प्राधान्य देणे आणि नागरिकांच्या सहभागातून उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या बैठकीला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, शहर चिटणीस अनिकेत पवार, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, शहर चिटणीस अनिकेत भालेकर, शक्तिकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष महेश तटकरे, अमोल भोबस्कर, भाजपा प्रेरित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह भाजपा, युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

