(रत्नागिरी / वार्ताहर)
इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराच्या सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये ओम नंदकुमार बाणे याने जिल्ह्यात सहावा, तर दुर्वांक प्रवीण प्रभूकेळुसकर याने पंधरावा क्रमांक पटकावला.
शिष्यवृत्ती परीक्षेत ओम नंदकुमार बाणे (६ वा), दुर्वांक प्रवीण प्रभूकेळुसकर (१५ वा), श्रीयांश राकेश पवार (४१ वा), ग्रंथा सुरज सनगरे (४६ वी), श्रीशांत प्रशांत दिवाडकर (५७ वा) आणि आराध्या गुरुदास खुळे (९३ वी) यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार द न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, कौन्सिल सदस्य शुभांगी वायकूळ, मुख्याध्यापक विनोद नारकर आणि पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम, गीताली शिवलकर, उदय आरेकर, शिवानी मोहिते आणि संपदा सावंत यांनी मार्गदर्शन केले.
गुणवत्ता शोध परीक्षेतही विद्यार्थ्यांची चमक
याशिवाय गुणवत्ता शोध परीक्षेतही शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. इयत्ता चौथीतील ओम नंदकुमार बाणे याने राज्य यादीत १३ वा क्रमांक मिळवला.
गुणवत्ता शोध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये:
इयत्ता चौथी : ओम नंदकुमार बाणे (राज्य यादीत १३ वा), श्रीयांश राकेश पवार, श्रीशांत प्रशांत दिवाडकर आणि दुर्वांक प्रवीण प्रभुकेळुसकर.
इयत्ता तिसरी : चिन्मय अभिजीत काटदरे (राज्य यादीत ९ वा), अवनी सुशील पेटकर, अवनी अभिजीत ढाणे आणि आरोही संतोष कदम.
इयत्ता दुसरी : ओवी ऋषिकेश जाधव (राज्य यादीत १५ वा), निल राजेश भातडे, निषाद ऋषिकेश मेहेंदळे, मीरा संकेत महाडिक आणि काव्या राजेश भगवे.
इयत्ता पहिली : दुर्वांक परेश बापार्डेकर, नीरजा अभिजीत सहस्त्रबुद्धे आणि अनन्या अनिकेत जोशी.
या विद्यार्थ्यांना उदय आरेकर, शिवानी मोहिते, संपदा सावंत, महेश साळुंके, नेहा भातडे आणि ज्योती शेंडगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

