(खेड)
“स्वस्थ नारी सशक्त परिवार” विशेष अभियान अंतर्गत आज (दि. 27 सप्टेंबर 2025) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तिसंगीच्या अंतर्गत उपकेंद्र बिजघर येथे महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात महिलांना आरोग्याविषयी जनजागृती करून त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले. यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, ॲनिमिया, सिकलसेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी, एनसीडी तपासणी, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड ई-केवायसीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरास कर्जी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ पदाधिकारी यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल दराडे, आरोग्य सहाय्यक श्री. देविदास खेडेकर व श्री. सुमित तायडे, LHV श्रीमती सुषमा तांबे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. आकाश दातीर, आरोग्य सेवक श्री. सतिश गर्जे, आरोग्य सेविका श्रीमती सुवर्णा सपकाळ, श्रीमती दीप्ती खेडेकर, श्रीमती रुपाली चव्हाण, गट प्रवर्तक श्रीमती सेजल भोसले, तसेच बिजघर अंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
ग्रामपंचायत सरपंच श्रीमती शुभांगी भोसले, पोलिस पाटील प्राची मर्चंडे, समाजसेवक विजय येरूणकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

