( राजापूर / वार्ताहर )
तालुक्यातील सागवे-बुरुंबेवाडी येथे ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आरती संदिप गुरव (वय ३२, रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती गुरव यांना मागील काही दिवसांपासून डोक्याचा आजार होता. या आजारामुळे त्या त्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सागवे-बुरुंबेवाडी येथील त्यांचा भाऊ ओकार बाळकृष्ण फुटक यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी ओकार फुटक यांनी दिलेल्या खबरीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची नोंद २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

