(राजापूर / तुषार पाचलकर)
पुरोगामी ही एक विचारधारा असून दिनदर्शिकेच्या माध्यमातून ती समाजापर्यंत हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी केले.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम नुकताच राजापूर तालुक्यातील कै. स्वा. से. आबा नारकर सभागृह पाचल येथे नुकताच पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पुरोगामी समिती गेले २० ते २५ वर्षे शिक्षकांच्या प्रश्नासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उल्लेखनीय असे उपक्रम राबवत असलेल्या ने राजापूर तालुका विद्यार्थी गुणवत्तेमध्ये नंबर एक आहे. सेवानिवृत्त झालेल्या ८० ते ९० वर्षाच्या शिक्षकांचा आज सन्मान होतोय. हा स्तुत्य असा उपक्रम आहे. अशा बुजुर्ग व्यक्तीच्य मार्गदर्शनाखाली काम करणारी पुरोगामी शिक्षक समिती भविष्यात तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील एक आदर्शवत शिक्षक संघटना म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रकाश पाध्ये यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे जिल्हा अध्यक्ष यशवंत पेढांबकर होते.
यावेळी व्यासपीठावर पाचल चे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे, सिध्दांर्थ जाधव, संघटनेचे पदाधिकारी राज्य संघटक यशवंत पाडावे, जिल्हा सल्लागार सुरेश साळवी, शशिकांत सकपाळ, नितीन कोलते, विजय कलकुटकी, रामदास कदम, प्रदीप पवार, विनायक खानविलकर, शिंदे सर, आदि मान्यवर उपस्थित होते.
या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमात वयोवृध्द सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी आणि रंगनाथ सप्रे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळ श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन सुरेश साळवी व विनायक खानविलकर यांनी केले.

