(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व निबंध स्पर्धांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे आयोजन जेष्ठ स्वातंत्र सैनिक कै. गो.बा.तथा आबा नारकर, जेष्ठ स्वातंत्र सैनिक कै.पुंडलिक तथा अण्णा वायकुळ,तसेच सरस्वती विद्यामंदिर पाचल प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. गुरुवर्य चं.बा. साखळकर सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ करण्यात आले होते.
स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. उद्घाटन प्रसंगी बोलताना स्पर्धाप्रमुख व संस्थेचे सहसचिव श्री किशोर नारकर यांनी अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील अभिव्यक्ती कौशल्य, आत्मविश्वास व विचार मांडण्याची क्षमता विकसित होते असे मत व्यक्त केले.
जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक शाळा व महाविद्यालयातील एकूण 85 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. इयत्ता पाचवी ते पंधरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.वक्तृत्व, कथाकथन व निबंध या तिन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.
वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे परीक्षण श्री .बी.के. गोंडाळ, श्री.रवींद्र सदाशिव खल्ले, श्री.नंदकुमार गणपतराव जाखले , श्री.प्रदीप रंगराव पाटील यांनी तर कथाकथन स्पर्धांचे परीक्षण प्रा.डॉ.राजेंद्र सावळाराम बावळे आणि प्रा. डॉ.विकास शंकर पाटील यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विषय मांडणी, भाषा शुद्धता, आत्मविश्वास, सादरीकरण शैली व विचारांची स्पष्टता या निकषांवर मूल्यमापन केले. स्पर्धक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
स्पर्धेचा निकाल
कथाकथन स्पर्धा गट क्रमांक 1,पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक ओम उदय यादव- आदर्श विद्यामंदिर वाटूळ , द्वितीय आरोही श्रीकांत फडतरे – नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी, तृतीय संयुक्ता विनोद मोरे – कै.आत्माराम आयरे विद्यालय मिळंद, उत्तेजनार्थ ईश्वरी देविदास चव्हाण – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, गट क्रमांक 2 इ.आठवी ते दहावी प्रथम क्रमांक आर्या उदय यादव – जवाहर नवोदय विद्यालय पडवे, द्वितीय पूर्वा अनिरुद्ध आठल्ये – श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय कोंडगाव साखरपा, तृतीय निलम श्यामसुंदर धावलकर – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, उत्तेजनार्थ कल्याणी नारायण पवार – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, गट क्रमांक 3 अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक वैदेही रामभाऊ गांगण – सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल,द्वितीय अनुश्री रवींद्र शेलार – सरस्वती विद्यामंदिर रिंगणे, तृतीय सानिया उदय यादव – श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा, उत्तेजनार्थ रिद्धी संदीप सोडये – इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोंडये.
निबंध स्पर्धा विजेते विद्यार्थी गट क्रमांक 1 पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक आर्ष नितीन सांडम – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, द्वितीय भूमी महेश बंडबे – डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली, तृतीय ऋतुजा प्रकाश पाटेकर – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब, गट क्रमांक 2 आठवी ते दहावी प्रथम क्रमांक भक्ती हेमंत सागवेकर – निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडये, द्वितीय सफा वसिम कालसेकर – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, तृतीय गीतांजली सुनील पांचाळ – माध्य. विद्यालय गोठणे दोनिवडे, गट क्रमांक 3 अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक आकांक्षा अरविंद चौगुले – नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी, द्वितीय क्रमांक काजल प्रवीण ऐनारकर – इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोंडये,तृतीय वैष्णवी नंदकुमार चव्हाण – राजापूर हायस्कूल राजापूर, वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक एक पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक आरोही श्रीकांत फडतरे – नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी, द्वितीय सना दत्तात्रय कारेकर – श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे, तृतीय सृष्टी गणेश कांबळे – कै.आत्माराम आयरे विद्यालय मिळंद, उत्तेजनार्थ स्वरा कृष्णकांत सुतार – जि प शाळा पाचल नंबर दोन दिवाळवाडी, इयत्ता आठवी ते दहावी गट क्रमांक दोन प्रथम क्रमांक ऋतुजा रवींद्र मिरजोळकर – श्रीम. उमाताई शरद परुळकर माध्य विद्यालय वडवली, द्वितीय तपस्या गुरुप्रसाद बोरकर – फाटक हायस्कूल रत्नागिरी , तृतीय जस्लीन फैयाज हाजू – उत्कर्ष माध्य. विद्यामंदिर खरवते, उत्तेजनार्थ प्रतीक्षा बाळकृष्ण बोडेकर – सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल , गट क्रमांक तीन अकरावी ते पंधरावी प्रथम क्रमांक सानिया उदय यादव – श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा, द्वितीय अनुश्री रवींद्र शेलार – सरस्वती विद्यामंदिर रिंगणे, तृतीय ओंकार मंदार आठवले – गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, उत्तेजनार्थ श्रुती विलास कलमष्टे – मनोहर हरी खापणे कला वाणिज्य महाविद्यालय पाचल
स्पर्धा दिनांक 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी दोन दिवस पार पडली असून विजेत्या विद्यार्थ्यांना दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल चे सर्व संचालक तसेच प्रा.डॉ.चंद्रकांत पोतदार जेष्ठ साहित्यिक, कोल्हापूर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्याला व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अशोक सक्रे, सचिव श्री.रामचंद्र वरेकर, खजिनदार श्री. राजेंद्र लब्दे, सहसचिव तसेच स्पर्धा प्रमुख श्री. किशोर नारकर, संस्था सदस्य श्री. सिद्धार्थ जाधव, श्री. राजेंद्र रेडीज, श्री.विकास कोलते, श्री. लिंगायत, सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचलच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा गुरखे, पर्यवेक्षिका सौ.गांधी, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री. विनायक सक्रे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर वर्गाने तसेच सरस्वती विद्यामंदिर पाचल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.

