(राजापूर / तुषार पाचलकर)
आज जागतिक योगा दिनाचे औचित्य साधत राजापूर तालुक्यातील केंद्रशाळा ओझर नं. १येथे अंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मुलांचा वॉर्म अप घेऊन उभी आसने, बैठीआसने, पाटीवर झोपून आसने, पोटावर झोपून आसने घेण्यात आली. त्यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्ध पद्मासन, पद्मासन, वज्रासन, अर्ध हलासन, हलासन, नौकासन, उष्ट्रासन, बद्ध पद्मासन, भुजंगासन, शवासन, अश्या प्रकारे आसने प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
त्यानंतर प्राणायाम प्रकार अनुलोम /विलोम, भस्रिका, कपालभाती, शीतली, भ्रामरी हे प्रकार प्रात्यक्षिके घेताना सूर्य नमस्कार प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. श्री.चौगले गुरुजी यांनी पाठदुःखी, कंबरदुःखी यावर उपायात्मक काही व्यायाम प्रकार यावेळी सादर केले. सर्व सादरीकरनामध्ये श्री. रामचंद्र मोरे गुरुजी, शैलेश बंदसोडे गुरुजी, चौगले गुरुजी,श्री.गायकवाड गुरुजी यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
उपक्रमाच्या शेवटी श्री.बंदसोडे गुरुजी यांनी जीवनातील योग, व्यायाम यांचे महत्व व्यक्त केले. श्री. गायकवाड गुरुजी यांनी प्राणायाम, मेडिटेशन यांचे महत्व समजावून सांगितले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.