(राजापूर / तुषार पाचलकर)
जवळेथर येथे शिवसेना, युवासेना आणि श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळेथर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन सभापती सौ. नंदिनी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, उपविभागप्रमुख उदय राणे, युवासेना विभागप्रमुख युवराज मोरे, महिला विभागप्रमुख श्वेता पवार आणि युवासेना विभागप्रमुख विद्या लांजेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशासक सरपंच सौ. अंजली मोरे प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाला डॉ. तांदळे, डॉ. प्रवीण, डॉ. कांबळे, कुवळेकर सिस्टर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सूरज पवार, अंकित कुळ्ये यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये डॉ. प्रितेश गुरव, डॉ. अनिकेत इंदुलकर, डॉ. प्रतीक गुरव, सुयोग जाधव आणि अक्षय मोरे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. तपासणीनंतर गरजेनुसार पुढील उपचार तसेच चष्म्याबाबतही सल्ला देण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सरपंच सुरेश मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे, शिवसेना शाखाप्रमुख तुषार धावडे, युवासेना शाखाप्रमुख हितेंद्र सकपाळ आणि महिला शाखाप्रमुख मंगला धावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक जनहिताच्या शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

