(संगमेश्वर / वार्ताहर)
नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत यशाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. राज्यस्तरासह केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्कृष्ट यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंथन परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे फलित असल्याचे विद्यालय व्यवस्थापनाने सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशक्ती आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळेत विशेष उपक्रम राबविण्यात आले. नियमित सराव परीक्षा, प्रश्नसंच सोडविणे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शंकानिरसन सत्रांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचेच प्रतिबिंब या यशात दिसून आले.
राज्यस्तरावरील यशस्वी विद्यार्थी
तैमूर मेहराज आंबेडकर, रय्यान बिलाल आंबेडकर, तानिया मेहराज आंबेडकर, रायन रमजान गोलंदाज, संजन्या सुभाष मुळ्ये, स्मित दिलीप सनगरे, पूर्वी संजय मांजरेकर, दामिनी रमेश मेस्त्री आणि सत्यजीत गणेश भोसले यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळविले.
केंद्रस्तरावरील यशस्वी विद्यार्थी
इम्रान हवालदार, श्राव्या प्रथमेश वेल्ये, अलिना अतिक बोट, नुझहत अश्फर हफसानी, अल्तमश अल्ताफ कपडे, सबा शोएब अलजी, आराध्या समिंदर नागवेकर, मुशफिरा रईस अलजी, समिरा अल्ताफ कपडे, सारा जुनेद खान, आयू रुपेश लिंगायत, मिहीर दीपक गोनबारे, अफ्रा अशफाक आंबेडकर, अकीया अझीम आंबेडकर, स्नेहराज राजेंद्र घाणेकर, अथर्व भारत माटल, नवमान अझहर जामभरकर, आफिया हारून आंबेडकर, गार्गी अंकुश जाधव, मर्झिया नुरुद्दीन केळकर, रिदा रिझवान केळकर, विराज सुभाष मुळ्ये आणि अंश सुहास साळसकर यांनी केंद्रस्तरावर यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनाचा सर्व स्तरांतून गौरव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नवनिर्मिती फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील असून, या यशातून त्या कार्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

