(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली २४ वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर, ९ वी कॅडेट, २४ वी सीनियर क्युरोगी तसेच १३ वी सब-ज्युनिअर, ९ वी कॅडेट, १३ वी ज्युनिअर व सीनियर पुमसे जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉल, सावरकर चौक येथे १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांतील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्युरोगी (फाईट) व पुमसे या दोन्ही प्रकारांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती रंगल्या.
स्पर्धा तालुका अकॅडमीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. सुभाष बने, संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा सचिव लक्ष्मण कर्रा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड आणि पंच प्रमुख भरत कर्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, सभापती शर्वरी वेले, उपसभापती प्रफुल्ल बाईत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, उपाध्यक्षा ॲड. सौ. पुनम चव्हाण, शशांक घडशी, रुपाली कदम, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, नगरसेवक यशवंत गोपाळ, सौ. आंबेकर, तालुका अकॅडमीचे खजिनदार चिन्मय साने, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, पालक प्रतिनिधी आदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, पदाधिकारी, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूणचा फाईटमध्ये तर युवा तायक्वांदो क्लबचा पुमसेमध्ये किताब
क्युरोगी (फाईट) स्पर्धेत चिपळूण तालुक्याने प्रथम, संगमेश्वर तालुक्याने द्वितीय, तर एस.आर.के. तायक्वांदो क्लबने तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला.
पुमसे स्पर्धेत युवा तायक्वांदो क्लबने प्रथम, संगमेश्वर तालुक्याने द्वितीय, तर चिपळूण तालुक्याने तृतीय क्रमांकाचा चषक मिळविला.
बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, व्यंकटेश्वरराव कर्रा, सौ. स्मिता लाड, शशांक घडशी, प्रफुल्ल भुवड, ॲड. पुनम चव्हाण, रुपाली कदम, दुर्वा मोघे, मृण्मयी सावंत, पिहू कांगणे, पवित्रा मसुरकर, अनुराधा माळी, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, संकेत मापुस्कर, पंकज मेस्त्री, राहुल चव्हाण, मयुरी राऊत तसेच जिल्ह्यातील प्रशिक्षक, पदाधिकारी व पालकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे यांनी केले.
संगमेश्वर तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीअंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आणि लायन्स तायक्वांदो क्लब, संगमेश्वर यांच्या खेळाडूंनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत फाईट आणि पुमसे या दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले. स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
फाईट स्पर्धेतील पदक विजेते
स्पेशल मुली
जिविता देशपांडे – सुवर्ण
शुभ्रा माळी – सुवर्ण
अभिज्ञा राणे – सुवर्ण
स्पेशल मुले
निकुंज घडशी – रौप्य
तनुष पेडणेकर – रौप्य
अनुराग यादव – सहभाग
सब-ज्युनिअर मुली
रितिशा कांगणे – सुवर्ण
दुर्गा मोघे – सुवर्ण
अवनी भिंगार्डे – रौप्य
शौर्या वाघमोडे – रौप्य
सई संसारे – कांस्य
मिहिका लाड – कांस्य
लक्ष्मी मोघे, हिरन्मयी भागवत, संस्कृती चव्हाण – सहभाग
सब-ज्युनिअर मुले
आरुष जाधव – रौप्य
अन्वय कोळवणकर – कांस्य
शौनक राजवाडे – कांस्य
शर्विल कांगणे, ईशान भागवत, वेदांत मसुरकर, अर्णव बंडबे, शौर्य मिर्गल, गंधार रेवडेकर, ऋत्विक कांगणे – सहभाग
कॅडेट मुली
ईश्वरी कांगणे – रौप्य
तनिष्का कांगणे – कांस्य
पूर्वा रहाटे, सांची मुंडेकर, प्रचिती कदम – सहभाग
कॅडेट मुले
साहिल जागुष्टे – सुवर्ण
अंश पवार – सुवर्ण
यशराज कटके – सुवर्ण
अधिराज कदम – सुवर्ण
अफजान फुलारी – कांस्य
आर्य भोसले, पीयूष रहाटे, वेद पटेल, अर्णव सुर्वे, ओमराजे, अजिंक्य शिंदे, मंथन चव्हाण, पृथ्वीराज कटके, शौर्य पेडणेकर, सोमांश सावंत – सहभाग
ज्युनिअर मुले
प्रथमेश शेट्ये – रौप्य
शौर्य लोध, सोहम चव्हाण – सहभाग
सीनियर मुले
वेदांत गिड्ये – सुवर्ण
राज रसाळ – सुवर्ण
आशिष रसाळ – सुवर्ण
सुमित पवार – रौप्य
ओम घाग – कांस्य
करण जाधव – कांस्य
सोहम लाड – सहभाग
पुमसे स्पर्धेतील पदक विजेते
पुमसे प्रकारातही संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट यश मिळविले. सब-ज्युनिअर बेसिक पुमसेमध्ये ईशान भागवत (कांस्य), दुर्गा मोघे (रौप्य), शौर्य माळी-दुर्गा मोघे (रौप्य), शौर्य माळी-ईशान भागवत-ऋत्विक कांगणे (सुवर्ण), नक्षत्रा शिंदे-मिहिका लाड-दुर्गा मोघे (सुवर्ण) यांनी पदके मिळविली.
कॅडेट बेसिक पुमसेमध्ये साहिल जागुष्टे (सुवर्ण), मंथन चव्हाण (कांस्य), सोमांश सावंत-साहिल जागुष्टे-अधिराज कदम (सुवर्ण) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
ज्युनिअर बेसिक पुमसेमध्ये आदित्य चिपळूणकर (रौप्य) तर सीनियर बेसिक पुमसेमध्ये समृद्धी घडशी (सुवर्ण), मयुरी राऊत (रौप्य), वैदही भस्मे (कांस्य), सुमित पवार-मयुरी राऊत (सुवर्ण), आशिष रसाळ-वैदही भस्मे (रौप्य), सुमित पवार-आशिष रसाळ-यश जाधव (सुवर्ण) तसेच मयुरी राऊत-वैदही भस्मे-समृद्धी घडशी (सुवर्ण) यांनी पदके पटकावली.
फ्रिस्टाईल पुमसेमध्ये शौर्य माळी (सुवर्ण), दुर्गा मोघे (कांस्य), लक्ष्मी मोघे-ऋत्विक कांगणे (रौप्य), साहिल जागुष्टे (सुवर्ण), सोमांश सावंत (कांस्य), यशराज कटके-संस्कृती कांगणे (रौप्य), आदित्य चिपळूणकर (रौप्य) तसेच सुमित पवार, मयुरी राऊत, आशिष रसाळ, वैदही भस्मे आणि समृद्धी घडशी यांच्या गटाने सुवर्णपदक मिळविले.
या सर्व खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे आणि सुमित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय पंच साईप्रसाद शिंदे, मयुरी राऊत आणि ओम घाग यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
या यशाबद्दल माजी आमदार डॉ. सुभाष बने, आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष परेश खातू, उपाध्यक्षा ॲड. पुनम चव्हाण, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रफुल्ल भुवड, सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे, संकेत मापुस्कर, पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री, सिद्धी केदारी, वेदांत गिड्ये, पालक प्रतिनिधी आदिती लोध, रुपाली कदम, स्वाती नारकर, अनुजा नार्वेकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे आदींनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

